कॅलिग्राफीच्या माध्यमातून बी.एस.एफ, आर्मीला शुभेच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॅलिग्राफीच्या माध्यमातून बी.एस.एफ, आर्मीला शुभेच्छा
कॅलिग्राफीच्या माध्यमातून बी.एस.एफ, आर्मीला शुभेच्छा

कॅलिग्राफीच्या माध्यमातून बी.एस.एफ, आर्मीला शुभेच्छा

sakal_logo
By

कॅलिग्राफीच्या माध्यमातून बी.एस.एफ., आर्मीला शुभेच्छा
रचना संसद कॉलेजच्‍या विद्यार्थ्यांचा उपक्रम
मुंबई, ता. २८ : रचना संसद कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट अँड क्राफ्टमधील विद्यार्थ्यांनी ‘कॅलिग्राफी’ आणि चित्राच्या माध्यमातून बी.एस.एफ. युनिटला तसेच आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या सर्व देश रक्षणकर्त्यांना शुभेच्छा देण्याचा अभिनव उपक्रम २६ जानेवारीच्या निमित्ताने राबवला, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
भारताला २६ जानेवारी रोजी भारतीय संविधान लागू झाले आणि त्या दिवसापासून भारत एक सार्वभौम आणि प्रजासत्ताक राज्य बनला, त्याची आठवण व्हावी, यासाठी प्रेरणादायी कॅलिग्राफिक पोस्टरद्वारे सीमा सुरक्षा दल - बी.एस.एफ.चे मनोबल वाढवण्यासाठी पुढाकार घेत भारतीय प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य आणि भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या संकल्पना प्राध्यापक डॉ. अनिल नहाते यांनी मांडून त्यासाठी विद्यार्थ्यांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्यातून एक प्रेरणादायी विचार कॅलिग्राफी अर्थात सुलेखन कलेच्या माध्यमातून लिहून घेतला. याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी कॅलिग्राफिक पोस्टरद्वारे सीमा सुरक्षा दल - बी.एस.एफ.चे मनोबल वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आणि ही संकल्पना प्रत्यक्षात मांडली.


एक भारतीय नागरिक म्हणून आपण आपल्या देशासाठी काही तरी केले पाहिजे, हा विचार मनात आला. त्यातून विद्यार्थ्यांना ही प्रेरणा देण्यात आली. दरम्यान विविध प्रकारांच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संस्थेचे संचालक अरविंद ममानीया, प्रभारी प्राचार्य डॉ. प्राजक्ता पर्वतीकर व इतर प्राध्यापकांनी आपले योगदान दिले आहे.
– डॉ. अनिल नहाते, प्राध्‍यापक