पदवी प्रमाणपत्रावरील तपशील दुरुस्त होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदवी प्रमाणपत्रावरील तपशील दुरुस्त होणार
पदवी प्रमाणपत्रावरील तपशील दुरुस्त होणार

पदवी प्रमाणपत्रावरील तपशील दुरुस्त होणार

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : मुंबई विद्यापीठाचा २०२२ चा दीक्षांत समारंभ २३ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडणार आहे. यासाठी प्रथम सत्र २०२२ मध्ये विद्यापीठाने घेतलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर मराठी (देवनागरी) नावातील संभाव्य चुका टाळण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी व पडताळणीसाठी सर्व तपशील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ३० जानेवारीपासून ते ८ फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थी व महाविद्यालयांनी आपल्या मराठी नावाचा तपशील अचूक आहे का हे पाहावे, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी केले आहे.