Thur, March 30, 2023

कोरोना; दिवसभरात फक्त एका रुग्णांची नोंद
कोरोना; दिवसभरात फक्त एका रुग्णांची नोंद
Published on : 31 January 2023, 7:55 am
दिवसभरात फक्त एका कोरोना रुग्णांची नोंद
मुंबई, ता. ३० : मुंबईतून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर असून सोमवारी दिवसभरात फक्त एका कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५५ हजार २४८ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७४७ वर स्थिरावली आहे. दरम्यान, दिवसभरात चार रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख ३५ हजार ४९३ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे सध्या आठ सक्रिय रुग्ण आहेत.