डॉ. होमी भाभा विद्यापीठाने नावीन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. होमी भाभा विद्यापीठाने
नावीन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात!
डॉ. होमी भाभा विद्यापीठाने नावीन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात!

डॉ. होमी भाभा विद्यापीठाने नावीन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात!

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : डॉ. होमी भाभा यांनी देशाच्या वैज्ञानिक प्रगतीला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. ‘अणुशक्ती’ क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी डॉ. भाभा यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या नावाप्रमाणे विद्यापीठाने नावीन्यपूर्ण संकल्पना राबवून उत्कृष्ट विद्यापीठ म्हणून शैक्षणिक वाटचाल करावी, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
डॉ. होमी भाभा राज्य समूह विद्यापीठाच्या नव्या कार्यालयाचे उद्‍घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, होमी भाभा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करून ई-लर्निंग स्टुडिओचेही उद्‍घाटन करण्यात आले.
डॉ. होमी भाभा यांचे ऋण देशावर आहेत. त्यांचे नाव या विद्यापीठाला देऊन महाराष्ट्रातील पहिले अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. नवीन शैक्षणिक धोरणात अधिकाधिक अभिमत विद्यापीठाची संकल्पना मांडली असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.