खासदार नवनीत राणांना एक हजारांचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार नवनीत राणांना एक हजारांचा दंड
खासदार नवनीत राणांना एक हजारांचा दंड

खासदार नवनीत राणांना एक हजारांचा दंड

sakal_logo
By

बोगस जात प्रमाणपत्राच्या सुनावणीला गैरहजेरी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३० : बोगस जात प्रमाणपत्राशी संबंधित दाव्याच्या सुनावणीला सतत गैरहजर राहणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने एक हजार रुपये दंड सुनावला. शिवडी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोमवारी न्यायालयात राणा यांच्या वतीने त्यांचे वकील हजर होते. त्यांनी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती न्यायालयात केली. तसेच सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्यामुळे दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी घेऊ नये, अशी विनंती करण्यात आली होती; मात्र न्यायालयाने ही मागणी अमान्य केली. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेली याचिका दिवाणी स्वरूपात असून शिवडी न्यायालयात असलेली याचिका फौजदारी स्वरूपात आहे. त्यामुळे सुनावणी सुरू ठेवण्याची मागणी अभियोग पक्षाने केली. उच्च न्यायालयाने राणा यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा निर्वाळा दिला आहे. यावरून शिवडी न्यायालयाने कारवाई सुरू केली आहे. १६ फेब्रुवारी रोजी यावर पुढील सुनावणी होणार आहे.