भारतीय बँकिंग व्यवस्था स्थिर रिझर्व्ह बँकेचा विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय बँकिंग व्यवस्था स्थिर रिझर्व्ह बँकेचा विश्वास
भारतीय बँकिंग व्यवस्था स्थिर रिझर्व्ह बँकेचा विश्वास

भारतीय बँकिंग व्यवस्था स्थिर रिझर्व्ह बँकेचा विश्वास

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : भारतीय बँकिंग व्यवस्था स्थिर असून कोणत्याही आव्हानातून तरुन जाईल, असा विश्वास रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदाणी उद्योग समूहाच्या कंपन्यांबद्दल संशय निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने हे विधान केले आहे.

अदाणी समूह कंपन्यांना भारतीय बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज दिल्याचे या अहवालात म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे विधान महत्त्वाचे आहे. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या पाहणीत चिंतेचे कारण दिसून आले नाही, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. भारतीय बँकांनी एका उद्योग समूहाला दिलेल्या कर्जांवर रिझर्व्ह बँकेची देखरेख आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. सेंट्रल रेपोझिटरी ऑफ इन्फॉर्मेशन पद्धतीनुसार पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जांची माहिती बँका रिझर्व्ह बँकेला देतात. त्यामुळे या कर्जांवर रिझर्व्ह बँकेचीही देखरेख राहते; तर रिझर्व्ह बँकेने आखून दिलेल्या मोठ्या कर्जविषयक मर्यादा चौकटीचेही पालन केले जाते, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.