
बोन्साय वृक्षप्रदर्शनातील देशीविदेशी प्रजातींचे आकर्षण
मुंबई, ता. ४ : घर, कार्यालयात सजावटीसाठी आणि वातावरण प्रसन्न राहावे यासाठी प्रसिद्ध असलेल्या बोन्साय अर्थात वामन वृक्षांचे प्रदर्शन प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमीत सुरू आहे. या प्रदर्शनाला वृक्षप्रेमींनी पसंती दिली आहे.
‘द इंडियन बोन्साय सोसायटी मुंबई’ या संस्थेचे यंदा हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या सोसायटीच्या सदस्यांनी तसेच इतर काही जणांची ६३ बोन्साय वृक्ष आणि त्यासोबत विविध आकार, रंगाचे ५० सुसेकी (शिलाखंड) मांडण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने विजया डोले यांनी मागील ५२ वर्षे जतन केलेला फायकस लिपस्टिक हा वृक्ष मोठे आकर्षण ठरला आहे. यासोबत रायटीया, सिलोनी फायकस, प्रेमना, बोगन वेल, गोरख चिंच, हिबिसकस, इंडियन बोन्साय, बोधी वृक्ष आणि विदेशी नावाने ओळख असलेले ऑस्ट्रेलियन फायकस, बुसीडा, फायकस लोगिसलिंड आदी अनेक बोन्साय वृक्ष येथे आहेत. बोन्साय सोसायटीच्या सुधीर जाधव, स्नेहा पराशर, करण मूलचंदाणी, नीता बानायत आदींनी संग्रहित केलेले शिलाखंड आणि बोन्साय वृक्ष येथे मांडले आहेत. यात फायकस लिपस्टिक, बोगन वेल, सुरुचे वृक्ष यांना पारितोषिक वितरित करण्यात आली आहेत.
...
अपंग मुलांच्या वृक्षांची विक्री
अपंग मुलांना आर्थिक हातभार मिळावा यासाठी द इंडियन बोन्साय सोसायटीमार्फत त्यांना नर्सरी, उद्यान आदींचे शिक्षण दिले जाते, त्याच शिक्षणातून लागवड करण्यात आलेले १०० हून अधिक वृक्ष या प्रदर्शनात विकले गेले असल्याची माहिती प्रशिक्षक मंचाने दिली.
...
कोरोनामुळे मागील काही वर्षे हे प्रदर्शन लावले गेले नव्हते;मात्र दोन दिवसांपासून लावण्यात आलेल्या या प्रदर्शनाला वृक्षप्रेमीनी चांगला प्रतिसाद दिला दिला आहे. बोन्साय ही वृक्षकला पुढील पिढीपर्यंत पोहचावी आणि ग्रामीण भागातील शेतकर्यांना लाभ व्हावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
- श्रीकृष्ण गाडगीळ, अध्यक्ष, द इंडियन बोन्साय सोसायटी, मुंबई