
महापालिकेचे सात हजार कोटी राज्य सरकारकडे थकीत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : महापालिकेच्या क्षेत्रातील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहायक अनुदान, मालमत्ता कर इत्यादीपोटी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत एकूण ७,२२३.४२ कोटी इतके येणे आहे. ज्यामध्ये राज्य शासनाच्या शिक्षण खात्याकडून सहायक अनुदानापोटी ५,४१९.१४ कोटी येणे असलेल्या रकमेचा अंतर्भाव आहे.
महापालिकेस राज्य शासनाकडून येणे असलेल्या रकमांच्या वसुलीबाबत महापालिकेच्या संबंधित खात्यांकडून महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येत आहे. मुंबई शहरात सुरू असलेली सर्व विकास कामे आणि त्याकरिता मोठ्या प्रमाणात आवश्यक असणाऱ्या निधीची गरज विचारात घेता, राज्य शासनाकडून महापालिकेस येणे असलेल्या थकबाकीचे अधिदान करण्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक विचार करावा, अशी विनंती आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केली आहे.
...
कोविड खर्चाची प्रतिपूर्ती
महापालिकेने कोविडच्या अनुषंगाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता स्वतःच्या उत्पन्नातून मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. ३० जून २०२२ पर्यंत झालेल्या खर्चापैकी जिल्हाधिकारी, मुंबई शहर जिल्हा आणि जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांच्याकडे अनुक्रमे ११,९४१.९४ कोटी आणि १९५८.११ कोटी इतक्या खर्चाची प्रतिपूर्ती राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (SDRF) मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून लवकरच प्रतिसाद मिळण्याची अपेक्षाही चहल यांनी व्यक्त केली आहे.