हवा प्रदूषणाचा धोका

हवा प्रदूषणाचा धोका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबईतील हवेचा स्तर सलग दोन दिवस खालावलेला दिसला. दमट हवेसह धुलीकण हवेच्या स्तरात होते.  यातून मुंबई शहरातील हवा अतिशय वाईट दर्जाची नोंदली गेली. मंगळवारी व बुधवारी मुंबईच्या संपूर्ण शहराचा दर्जा सफर या हवा दर्जा नोंदी प्रकल्पाकडून वाईट नोंदवला गेला. मंगळवारी एक्यूआय ३०४; तर बुधवारी २६६ नोंदवला. हवेच्या वाईट स्तरामुळे आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषणापासून बचाव करता येईल आणि श्वसन विकार टाळता येतील, असेही तज्ज्ञ सांगतात.
भांडुप, बीकेसी, चेंबूर आणि नवी मुंबई या चार महत्त्वाच्या शहरात ही हवेची वाईट गुणवत्तेची सफरने नोंद केली आहे. बुधवारी भांडुपचा एक्यूआय ३०१, अंधेरी ३०६, चेंबूर ३१३ आणि नवी मुंबईत ३१९ एवढा एक्यूआय नोंदला गेला. मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे हवेच्या प्रदूषणाची समस्या उद्भवत असल्‍याचे सांगितले जात आहे.
सलग दोन दिवस हवा दर्जा निर्देशांक खालावला असला, तरीही मंगळवारच्‍या तुलनेत बुधवारी झालेल्‍या नोंदीतील एक्यूआय हे काही अंशी कमी असल्‍याचे पहायला मिळाले. मात्र त्‍यावरील ‘वाईट’ हा शिक्‍का कायम आहे.

आरोग्‍याच्‍या समस्‍या वाढू शकतात
गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईतील हवाप्रदूषण वाढताना दिसत आहे. संपूर्ण मुंबई शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक मंगळवारी ३०४; तर बुधवारी २६६ एवढा नोंदविण्यात आला असून हा वाईट वर्गातील आहे. या दर्जाच्या प्रदूषणाने प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. तर मुंबई शहरानजीक नवी मुंबई परिसराचा हवा गुणवत्ता निर्देशांक मंगळवारी ३२८; तर बुधवारी ३१९ नोंदवला गेला असून येथील हवादेखील अतिशय वाईट दर्जातील आहे. त्‍यामुळे या ठिकाणी प्रत्येकाला आरोग्याचा इशारा देत हवेचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बुधवारी झालेल्‍या नोंदी
शहर एक्यूआय दर्जा
मुंबई २६६ वाईट
भांडुप ३०१ अतिशय वाईट
अंधेरी ३०६ अतिशय वाईट
बोरिवली १६६ मध्‍यम
चेंबूर ३१३ अतिशय वाईट
मालाड २३९ वाईट
माझगाव ११४ मध्‍यम
वरळी १४२ मध्‍यम
कुलाबा २६२ वाईट
बीकेसी ३०० वाईट
नवी मुंबई ३१९ अतिशय वाईट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com