‘कोस्टल’ला हुतात्मा राजगुरूंचे नाव द्या

‘कोस्टल’ला हुतात्मा राजगुरूंचे नाव द्या

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : कोस्टल रोडच्या नामकरणाबाबत वेगवेगळ्या मागण्या आणि प्रस्ताव येत आहेत. गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे नाव मुंबईतील नवीन कोस्टल रोडला देण्यात यावे, अशी मागणी मंगेशकर कुटुंबाकडून करण्यात आल्यानंतर आता हुतात्मा राजगुरू यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनने केली आहे.
मंगेशकर कुटुंबीयांना मागणी करून दोन दिवस होत नाहीत तोवर आता डबेवाल्यांनी आपली मागणी पुढे केली आहे. डबेवाले ज्या मावळ (पुणे) परिसरातून येतात त्या भागात हुतात्मा राजगुरू यांची जन्मभूमी आहे. मुंबईत साधारणतः दीडशे वर्षांपासून डबेवाले काम करत असून मुंबईची नवी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे मुंबई कोस्टल रोडला हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्वातंत्र्यप्राप्ती वगळता कोणतीही अभिलाषा मनात न धरता केवळ देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा राजगुरू या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे नाव मुंबई कोस्टल रोडला दिले तर उचित ठरेल, असे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.