मुंबई विमानतळावरून बेस्टची ‘प्रिमियम बससेवा’

मुंबई विमानतळावरून बेस्टची ‘प्रिमियम बससेवा’

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ९ : बेस्ट उपक्रमाने अलिकडेच ‘बेस्ट चलो अॅप’वर आधारित प्रीमियम बससेवा सुरू केली असून, या सेवांना प्रवाशांचा समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. त्या अनुषंगाने शनिवारपासून (ता. ११) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून शहराच्या विविध भागात प्रीमियम बससेवा सुरू करण्यात येणार आहे. एअरपोर्ट सेवा-१ ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते बॅकबे आगार दक्षिण मुंबई; तर एअरपोर्ट सेवा-२ ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खारघर- नवी मुंबई अशी धावणार आहे. या बस सेवेची संपूर्ण माहिती ‘बेस्ट चलो’ या मोबाईल अॅपमधील ‘चलो बस’ या पर्यायात उपलब्ध करण्यात आली आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याकरिता आपल्या मोबाईलमध्ये ‘चलो अॅप’ डाऊनलोड करून घ्यावे व सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘बेस्ट’कडून करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com