अहमदाबाद येथे कॅस्टर ऑईल परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहमदाबाद येथे कॅस्टर ऑईल परिषद
अहमदाबाद येथे कॅस्टर ऑईल परिषद

अहमदाबाद येथे कॅस्टर ऑईल परिषद

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ ः देशातील तेल उत्पादक आणि व्यापाऱ्यांची सर्वोच्च संघटना असलेल्या ‘द सॉलव्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’तर्फे (एसईए) अहमदाबाद येथे जागतिक एरंड तेल (कॅस्टर ऑईल) परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद २४ व २५ फेब्रुवारी रोजी होईल. या परिषदेत देश-विदेशातील चारशे प्रतिनिधी तसेच विशेषतज्ज्ञ निमंत्रित हजर राहून आपले विचार मांडतील.
या परिषदेतील सहभागी व्यक्तींना देशी व परदेशी खरेदीदार, व्यापारी, तज्ज्ञ, उत्पादक, कारखानदार आदींशी चर्चा करण्याची संधी मिळेल. कॅस्टर ऑईल संदर्भातील जगातील मागणीच्या नव्वद टक्के मागणी भारत पूर्ण करतो. त्यामुळे या क्षेत्रात भारताचा जगात दबदबा आहे. कॅस्टर ऑईलची भारताची निर्यात दरवर्षी बारा हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. जागतिक कॅस्टर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये पाच अब्ज अमेरिकी डॉलरचे व्यवहार होत असतात आणि ते भारतातील पुरवठ्यावरच अवलंबून असतात. गुजरातचे उद्योगमंत्री बलवंत सिंह राजपूत या समारंभाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील; तर स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेच्या दक्षिण आशिया विभागातील रिसर्च प्रमुख अनुभूती सहाय या प्रमुख पाहुण्या असतील.