सेन्सेक्समध्ये १४२ अंशांची वाढ

सेन्सेक्समध्ये १४२ अंशांची वाढ

Published on

मुंबई, ता. ९ ः आयटी तसेच अर्थसंस्था व बँकांच्या शेअरमध्ये शेवटच्या दोन तासात खरेदी झाल्यामुळे आज (ता.९) भारतीय शेअर बाजार निर्देशांक नफा दाखवू शकले. आज सेन्सेक्स १४२.४३ अंश निफ्टी २१.७५ अंश वाढला.

अमेरिकी फेडरल बँकेच्या आक्रमक विधानांमुळे आज जागतिक शेअर बाजारांप्रमाणेच भारतीय शेअर बाजार देखील सकाळी व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर विशिष्ट टप्प्यातच फिरत होते. मात्र, शेवटच्या दोन तासांत खरेदी झाल्यामुळे निर्देशांक नफा दाखवत बंद झाले. सेन्सेक्स ६०,८०६.२२ अंशांवर तर निफ्टी १७,८९३.४५ अंशावर स्थिरावला. आज धातू निर्मिती कंपन्या, वाहन निर्मिती कंपन्या, औषध निर्मिती कंपन्या यांच्या शेअरमध्ये विक्री झाली. केवळ आयटी आणि वित्त संस्थांच्या शेअरच्या खरेदीमुळेच शेअर बाजार सावरले. त्याखेरीज अन्य क्षेत्रे आज तोट्यातच होती. गेली एक-दोन दिवस आशा दाखवणारे अदाणी समूहाचे शेअर आज पुन्हा कोलमडले. आज अदाणी इंटरप्रायजेसचा शेअर ११ टक्के घसरला. अदाणी पोर्ट तीन टक्के घसरला. तर अदाणी पॉवर, अदाणी ट्रान्समिशन, अदाणी ग्रीन व अदाणी टोटल गॅस हे शेअर पाच टक्के घसरले. फक्त अदाणी विल्मर पाच टक्के वाढ दाखवत बंद झाला.
--
शेअर्समधील चढउतार
आज निफ्टीच्या प्रमुख शेअरपैकी हिरोमोटरकॉर्प, सिप्ला, जेएसडब्ल्यू स्टील या शेअरचे भाव कोसळले. तर बजाज फिन्सर्व, एचडीएफसी लाइफ, हिंदाल्को, एशियन पेंट, इन्फोसिस, इंडसइंड बँक हे शेअर दोन टक्क्यांच्या आसपास वाढले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.