ठाकरे-सातव हल्ल्याबाबत
कठोर कारवाई करा : गोर्‌हे

ठाकरे-सातव हल्ल्याबाबत कठोर कारवाई करा : गोर्‌हे

ठाकरे-सातव हल्ल्याबाबत
कठोर कारवाई करा : गोऱ्हे
मुंबई, ता. ९ : शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान औरंगाबादच्या बिडकीन परिसरात दगडफेक आणि काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्‍हे यांनी गंभीर दखल घेतली. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत गृहविभागाला निवेदनाद्वारे निर्देश दिले आहेत. याबाबत त्यांनी आज गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये यांना निवेदन दिले आहे. राज्यात घडलेल्या या दोन्हीही घटना अतिशय गंभीर आहेत. या दोन्ही घटनांचा आपल्या स्तरावरून सखोल तपास होण्याची आवश्यकता आहे. या दोन्ही घटनांमध्ये आरोपींना जामीन मिळू नये, यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, असेही त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com