सत्यपालज यांना बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार

सत्यपालज यांना बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : बाबा आमटे एकता अभियान ट्रस्ट या ट्रस्टचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ जेष्ठ रचनात्मक कार्यकर्ते आणि सर्वंटस ऑफ पिपल्स सोसायटीचे माजी सचिव सत्यपालज यांना जाहीर झाला आहे. प्रसिद्ध दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते व सादरकर्ते सिध्दार्थ काक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार प्रदान कार्यक्रम १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आनंदवन, वरोरा येथे होणार आहे.

समाज सेवक बाबा आमटे यांनी राष्ट्रीय एकता, सामाजिक सलोखा आणि पर्यावरण संरक्षण साधण्यासाठी संपूर्ण भारतातून युवक युवतींना बरोबर घेऊन दोन भारत जोडो सायकल यात्रा काढल्या होत्या. या यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर आणि ईटानगर ते ओखा अशा १९८५-८६ व १९८७-८८ या वर्षांत काढण्यात आल्या होत्या. बाबा आमटेंचे कार्य पुढे नेण्यासाठी दोन्ही भारत जोडो अभियानातील सायकल यात्रींनी मिळून ‘बाबा आमटे एकता अभियान ट्रस्ट’ची स्थापना केली. डॉ. विकास आमटे या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. १ लाख रुपये सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या समारंभात नागपूरचे वनराईचे गिरीश गांधी, कोलकत्याचे ओ. पी. शहा आणि अमरावतीचे डॉ. गोविंदराव कास्ट विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.