रस्त्याच्या दुरुस्ती
काय उपाययोजना करणार?

रस्त्याच्या दुरुस्ती काय उपाययोजना करणार?

Published on

मुंबई, ता. ९ : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा तसेच आरे वसाहतीतून जाणाऱ्या रस्त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी कोणत्या उपाययोजना करणार, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. तसेच त्याबाबतचा कृती आराखडा सादर करण्याचे आदेशही गुरुवारी न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
आरे दुग्ध वसाहतीतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली असून याबाबत स्थानिक रहिवाशी बिनोद अगरवाल यांनी जनहित याचिका दाखल केली. गुरुवारी प्रभारी मुख्य न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. आरे दुग्ध वसाहतीतील ७० वर्ष जुन्या आणि ४५ किलोमीटर रस्त्यांच्या डागडुजीची आवश्यकता असल्याचे याचिकाकर्त्यांनी सांगितले. त्याची दखल घेत रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीसाठी कोणत्या उपाययोजना करणार, असा सवाल विचारत खंडपीठाने त्याबाबतचा कृती आराखडा प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणावरील पुढील सुनावणी १७ मार्च रोजी निश्चित केली. दरम्यान,
महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या विंडसर रोड ते फिल्टरपाडा या रस्त्याच्या बिकट अवस्थेबाबत खंडपीठाने पालिका प्रशासनाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.