शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालय कर्मचारी संघटनांनी आज (ता. १६) राज्यभरात लाक्षणिक संप केला. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट आणि कलिना संकुलात, तसेच एसएनडीटी विद्यापीठाच्या चर्चगेट येथील मुख्य संकुलात हा लाक्षणिक संप करत कर्मचारी संघटनांनी दिवसभर धरणे दिले होते. मुंबई, ठाण्यातील अनेक वरिष्ठ महाविद्यालयांतही हे लाक्षणिक संप यशस्वी करण्यात आला. सरकारने या संपाची वेळीच दखल घेतली नाही, तर २० फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला.

एसएनडीटी विद्यापीठात विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघामार्फत एकदिवसीय लाक्षणिक संप करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे न्याय्य हक्कांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. त्या वेळी संघटनेचे महासचिव यशवंत गावडे यांच्या अध्यक्षतेखाली दिवसभराचा लाक्षणिक संप करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात कर्मचारी संघटनांच्या सर्व मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे जाहीर करण्यात आले होते; परंतु त्या बैठकीतील इतिवृत्त हाती पडणार नाही, तोपर्यंत आमचा हा संप सुरूच राहणार असल्याचा इशारा देऊन विद्यापीठ व महाविद्यालय कर्मचारी संघटनांनी संप सुरू ठेवला असल्याची माहिती संघटनेचे यशवंत गावडे यांनी दिली.