मेहुल चोक्सीला २५ हजारांचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेहुल चोक्सीला २५ हजारांचा दंड
मेहुल चोक्सीला २५ हजारांचा दंड

मेहुल चोक्सीला २५ हजारांचा दंड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १७ : पीएनबी बँक गैरव्यवहारामध्ये आरोपी असलेल्या व्यावसायिक मेहुल चोक्सीला मुंबई उच्च न्यायालयाने आज सतत सुनावणी तहकूब करतात म्हणून २५ हजार रुपये दंड ठोठावला. मागील सुनावणीलादेखील याचिकादारांनी सुनावणी तहकूब केली होती. त्यावेळी याचिका हरवल्याचे कारण सांगितले होते. त्यामुळे खंडपीठाने आज याचिकादाराला दंड सुनावला. ही रक्कम सीबीआयकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

चोक्सीला सीबीआय न्यायालयाने फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे. याबाबत त्याने केलेली एक याचिका काही दिवसांपूर्वी गहाळ झाली होती. आज न्या. नितीन सांब्रे आणि न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. माझ्या याचिकेची दुसरी प्रत मिळण्यासाठी मी रजिस्ट्री कार्यालयात अर्ज केला आहे, ही याचिका १८ फेब्रुवारीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजची सुनावणी तहकूब करावी, अशी मागणी चोक्सीच्या वतीने ॲड. राहुल आगरवाल यांनी खंडपीठाला केली. न्यायालयाने याबाबत नाराजी व्यक्त करत दंड ठोठावला. याचिकेवर पुढील सुनावणी १७ मार्चला होणार आहे.