शिझान खानकडून जामीन अर्ज मागे शिझान खानकडून जामीन अर्ज मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिझान खानकडून जामीन अर्ज मागे
शिझान खानकडून जामीन अर्ज मागे
शिझान खानकडून जामीन अर्ज मागे शिझान खानकडून जामीन अर्ज मागे

शिझान खानकडून जामीन अर्ज मागे शिझान खानकडून जामीन अर्ज मागे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी शिझान खान याने मुंबई उच्च न्यायालयात केलेला जामीन अर्ज आज (ता. २१) मागे घेतला. या प्रकरणी त्याने वसई सत्र न्यायालयात पुन्हा जामीन अर्ज केला आहे.

अलिबाबा - दास्ताने ए काबूल या मालिकेत काम करणारी तुनिषा शर्मा या २१ वर्षांच्या अभिनेत्रीने चित्रीकरण सेटवरच गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी नुकतेच पाचशे पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. यामध्ये त्याच्यावर तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शिझानच्या वतीने आज हा जामीन अर्ज मागे घेण्यात आला; मात्र त्याने पुन्हा एकदा वसई सत्र न्यायालयात अर्ज केला असून लवकरच यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दोघांच्या मोबाईलसह आणखी एक फोन फॉरेन्सिक विभागाकडे पाठवला आहे. आत्महत्येच्या दिवशी ती नेहमीप्रमाणे आनंदी मूडमध्ये होती; मात्र शिझानच्या रूममधून बाहेर पडताना तणावात होती, असे सीसी टीव्हीतील चित्रीकरणात दिसत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच त्यांच्यामधील मोबाईल चॅट आरोपपत्रात दाखल करण्यात आले आहे. सत्र न्यायालयाने शिझानचा जामीन यापूर्वी नामंजूर केला आहे.