पक्ष कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचा पहारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पक्ष कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचा पहारा
पक्ष कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचा पहारा

पक्ष कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचा पहारा

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : शिवसेनेचे चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून सोमवारी (ता. २०) विधान भवनातील पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर महापालिकेतील पक्ष कार्यालयही शिंदे गट ताब्यात घेण्याची शक्यता असल्याने ठाकरे गटाचे नेते दोन दिवसांपासून पक्ष कार्यालयाबाहेर ठाण मांडून बसले आहेत; मात्र तूर्तास शिंदे गटाचा एकही पदाधिकारी आणि कार्यकर्ता पक्ष कार्यालयाकडे न फिरकल्याने दोन्ही दिवस महापालिकेत शांतता राहिली.
महापालिकेतील शिंदे आणि ठाकरे गटाच्या राड्यानंतर सर्वच पक्षकार्यालये सील करण्यात आली. त्यानंतर पक्ष कार्यालयाबाहेर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वपक्षीय माजी नगरसेवक, गटनेते येऊन बसू लागले. त्यातच आता शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह मिळाल्याने महापालिकेतील कार्यालय ताब्यात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपासून पक्ष कार्यालयाबाहेर ठाण मांडले आहे. यात माजी नगरसेवक अनिल पाटणकर, रामदास कांबळे, स्वप्नील टेंभुळकर, गीता भंडारी, संगीता सुतार, प्रवीणा मोराजकर, स्नेहल मोरे, चंद्रावती मोरे, अंजली नाईक यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.