Sat, March 25, 2023

पश्चिम उपनगरात
अधिक उकाडा
पश्चिम उपनगरात अधिक उकाडा
Published on : 23 February 2023, 4:54 am
मुंबई, ता. २३ : मुंबईतील शहर आणि पश्चिम उपनगरातील तापमानात चढ-उतार होत आहेत. शहराच्या तुलनेत उपनगरात अधिक उकाडा जाणवत आहे. त्याचबरोबर उपनगरांमध्ये रात्रीच्या वेळी शहरापेक्षा अधिक गारवाही जाणवत असल्याने मुंबईकरांना ‘दिवसा उकाडा, तर रात्री थंडी’ अनुभवायला मिळत आहे.
शहरातील कुलाबा येथे आज कमाल तापमान ३०.५ अंश, तर पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ येथे ३४.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे, तर आर्द्रता अनुक्रमे ६९ आणि ३३ टक्के नोंदवली गेली. कमाल तापमान वाढत असले तरी किमान तापमान अजूनही बऱ्यापैकी खाली आहे. कुलाबा येथे किमान तापमान २२.५ अंश, तर सांताक्रूझ येथे १९.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.