जुनी पेन्शन योजनेच्या संपात शिक्षक परिषदही सहभागी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुनी पेन्शन योजनेच्या संपात शिक्षक परिषदही सहभागी
जुनी पेन्शन योजनेच्या संपात शिक्षक परिषदही सहभागी

जुनी पेन्शन योजनेच्या संपात शिक्षक परिषदही सहभागी

sakal_logo
By

मुंबई : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने १४ मार्च रोजी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सहभागी होणार आहे. त्यासाठी पुण्यात परिषदेच्या झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली. राज्यातील शैक्षणिक विषय, तसेच शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आढावा घेण्यासाठी शिक्षक परिषदेच्या कार्यकारिणीची दोन दिवस पुण्यात बैठक पार पडली. यात परिषदेचे राज्य अध्यक्ष सुनील पंडित, कार्यवाह राजकुमार बोन्नकीले, कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, माजी आमदार नागो गाणार, भगवानराव साळुंखे आदी उपस्थित होते. अनेक सूचना व मागण्या सुचवल्या आणि त्यानुसार मागण्यांचे निवेदन तयार करण्यात आले. राज्यस्तरीय संपामध्ये सर्व शाळांनी सहभाग घ्यावा अशा स्वरूपाचे आवाहन करण्यात आल्याचे शिवनाथ दराडे यांनी सांगितले.