आजपासून आरटीई प्रवेश; ऑनलाइन अर्ज करता येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजपासून आरटीई प्रवेश; ऑनलाइन अर्ज करता येणार
आजपासून आरटीई प्रवेश; ऑनलाइन अर्ज करता येणार

आजपासून आरटीई प्रवेश; ऑनलाइन अर्ज करता येणार

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : खासगी शाळांमध्ये मागास, आर्थिक दुर्बल आदी घटकांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २५ टक्के आरटीई प्रवेशासाठी बुधवारी (ता. १)ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. दुपारी ३ वाजल्यापासून नोंदणी सुरू केली जाणार आहे. पालक १७ मार्चला रात्री १२ वाजेपर्यंत यासाठी अर्ज करू शकतील.
राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित, खासगी विनाअनुदानित व खासगी कायम विनाअनुदानित अशा आठ हजार ८२७ शाळांमध्ये एकूण १ लाख १ हजार ९२६ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी पालकांनी http://student.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे. अर्ज भरताना पालकांनी विचारपूर्वक १० शाळांची निवड करायची असून शाळेची निवड करताना शाळा आणि घरापर्यंतचे अंतर विचारात घेणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी निवासाचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, जात प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग बालकांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र, अनाथ बालके आवश्यक कागदपत्रे, विधवा महिला आदी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.