
एनएमआयएमएसच्या परिसंवादाला उद्योग क्षेत्राचा मोठा प्रतिसाद
मुंबई, ता. ५ : एनएमआयएमएसच्या हैदराबाद कॅम्पसतर्फे आयोजित उद्योग विषयावरील परिसंवादाला देशातील बड्या उद्योग समूहांनी मोठा प्रतिसाद दिला.
एचआरडी विषयावर शनिवारी हा परिसंवाद झाला. त्यात एचसीएल टेक्नॉलॉजी, रेनबो हॉस्पिटल्स, एल अँड टी, बायोफोर फार्मास्युटिकल, विप्रो, हेतेरो ड्रग्ज आदी अनेक उद्योग समूहांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. उद्योग क्षेत्रातील कामाचे भवितव्य आणि त्यात आतापर्यंत झालेला विकास आणि बदल हा या परिसंवादाचा विषय होता. यामुळे या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील सध्याचे कल आणि होऊ घातलेले बदल यांची माहिती मिळाली. जगात आता या क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठा बदल झाला आहे. त्यामुळे ग्राहक केंद्री कारभार करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यासाठी त्यांनी कालबाह्य प्रक्रिया आणि यंत्रणा बदलल्याच पाहिजेत. त्यासाठी या सर्व प्रक्रियांची सतत तपासणी केली पाहिजे आणि त्यात नव्या तंत्रज्ञानामुळे बदल केले पाहिजेत, असेही यावेळी सांगण्यात आले. उद्योग क्षेत्रातील या मान्यवरांचे प्रत्यक्ष अनुभव आणि विचार पाठ्यपुस्तकातून मिळत नाहीत. त्यामुळे अशा परिसंवादांचा आम्हाला भरपूर फायदा झाला, अशी प्रतिक्रियाही विद्यार्थ्यांनी यासंदर्भात व्यक्त केली.