जैन समाज दुसऱ्यांना सुखदुःखात साथ देणारा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जैन समाज दुसऱ्यांना सुखदुःखात साथ देणारा!
जैन समाज दुसऱ्यांना सुखदुःखात साथ देणारा!

जैन समाज दुसऱ्यांना सुखदुःखात साथ देणारा!

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : जैन समाज हा दुसऱ्यांना सुखदुःखात साथ देणारा आहे. संकटप्रसंगी या समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रति त्यांची लोककल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज काढले.
राष्ट्रसंत परमपूज्य श्री नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज यांना आचार्यपद प्रदान महा-महोत्सव कार्यक्रम आज मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे झाला, त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू बाबा रामदेव तसेच देश-विदेशातील संत आणि जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने नुकताच राज्याचा अर्थसंकल्प घोषित केला असून यात सर्व लोकांच्या प्रगती आणि उन्नतीचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात गो-सेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रसंत नयपद्मसागरजी आणि प्रशांतसागरजी यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचे अभिनंदन केले. या वेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री लोढा, योगगुरू रामदेव यांच्या हस्ते ‘महान मंगल’ ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
...
आचार्य पदवी ही तपश्चर्या!
आज राष्ट्रसंत नयपद्मसागर यांना प्रदान करण्यात आलेली आचार्य ही पदवी असली, तरी हे पद एक तपश्चर्या आहे. आचार्य बनण्यासाठी तप करावे लागते. या पदावर पोहोचल्यानंतर कोटी कोटी जनतेच्या विधायक आशा-आकांक्षांना आशीर्वाद द्यावा लागतो. हे काम अविरतपणे सुरू राहणारे आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केली.