मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कारभारात अनियमितता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कारभारात अनियमितता
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कारभारात अनियमितता

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कारभारात अनियमितता

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कारभारात आर्थिक अनियमितता आणि नियमभंग झाल्याचा आरोप इंडियन मेजर पोर्ट्स अँड डॉक ऑफिसर्स असोसिएशनने केला आहे. यासंदर्भात केंद्रीय दक्षता आयोगाकडे तसेच संबंधित मंत्रालयाकडे तक्रार केल्याचाही संघटनेचा दावा आहे.

इंडियन मेजर पोर्टस् अँड डॉक ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष आर. संथानम यांनी नुकतीच पत्रकारांना ही माहिती दिली. याप्रकरणी नौका वाहतूक मंत्र्यांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्याने शासनाचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोपही संघटनेने केला. त्याविरोधात संघटनेने केंद्रीय दक्षता आयोगाकडे, तसेच विभागाच्या मंत्र्यांकडे तक्रारही केली आहे. माहिती कायद्याअंतर्गत माहिती मागितल्यानंतरही ती जलोटा यांच्याकडून दिली जात नाही. मंत्रिमंडळाकडून घेण्यात आलेल्या निर्णयांचे आणि केंद्र सरकारच्या आदेशांचे जलोटा हे उल्लंघन करीत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. शिस्तभंगाच्या कारवाईबाबत दक्षता आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन जलोटा करीत नाहीत. अन्य बंदरांमधील अध्यक्षांना काही भत्ते मिळत नसतानाही हे भत्ते अवैधरित्या घेत आहेत. मुळात जलोटा हे सचिव झाल्यानंतर या पदावर राहण्यास पात्र नव्हते, तरीही त्यांनी पद सोडले नाही, असाही आरोप संघटनेने यावेळी केला.