मुक्त संचारातून जीवाला धोका अधिकारांना छेद देणारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुक्त संचारातून जीवाला धोका अधिकारांना छेद देणारे
मुक्त संचारातून जीवाला धोका अधिकारांना छेद देणारे

मुक्त संचारातून जीवाला धोका अधिकारांना छेद देणारे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : नागरिकांच्या मुक्त संचाराच्या अधिकारावर जर जीवाला धोका निर्माण होण्याची किंवा इजा होण्याची भीती असेल तर तेही राज्य घटनेच्या जगण्याच्या अधिकारांना छेद देणारे आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नुकतेच व्यक्त केले आहे. उत्तुंग इमारती बांधताना आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची मागणी करणारी जनहित याचिका एका गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे. याचिकेवर न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली.

याचिकादार सोसायटीच्या ५२ व्या मजल्यावरून सिमेंट ब्लॉक पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. याची माहिती सोसायटीच्या वतीने पोलिसांना देण्यात आली आहे. अशा उंच इमारतींसाठी वापरण्यात येणाऱ्या क्रेनच्या वापराचा उल्लेखही यामध्ये करण्यात आला आहे. मुंबई शहर उपनगरात अशा उत्तुंग इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने यामध्ये प्राधान्याने लक्ष देऊन मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करायला हवी, असे निर्देश खंडपीठाने दिले. तसेच महापालिकेने सरकारच्या नगरविकास विभागाला व्यापक जनहिताच्या दृष्टीने याबाबत निर्देश देऊन तातडीने योजना आखणी करावी, संबंधित विभागाच्या सचिवांनी यामध्ये लोकहिताचा विचार करून दखल घ्यावी, असेही खंडपीठाने सूचित केले असून याचिका निकाली काढली.