अदानी ट्रान्समिशन सिंगल युज प्लास्टिक फ्री कंपनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अदानी ट्रान्समिशन सिंगल युज प्लास्टिक फ्री कंपनी
अदानी ट्रान्समिशन सिंगल युज प्लास्टिक फ्री कंपनी

अदानी ट्रान्समिशन सिंगल युज प्लास्टिक फ्री कंपनी

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ : अदाणी ट्रान्समिशनने वीस राज्यांतील ३७ केंद्रांवर एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिक वस्तूंपासून मुक्त होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अदाणी ट्रान्समिशनला एकदाच वापराच्या प्लास्टिक वस्तूंपासून मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री-आयटीसी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट तर्फे हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यासाठी या कंपनीच्या केंद्रांवर जाऊन केलेले परीक्षण आणि अन्य कागदपत्रांच्या तपासणीच्या आधारे अदाणी ट्रान्समिशनला हे प्रमाणपत्र देण्यात आले. अडाणी ट्रान्समिशनने आपल्या व्यवसायातील पहिल्या दहा कंपन्यांमध्ये येण्याचे ध्येय ठेवतानाच एकदाच वापरण्याच्या प्लास्टिक वस्तूंपासून मुक्त होण्यासाठीही प्रयत्न केले आहेत. त्यांनी आपली तीस उपकेंद्रे आणि सात परिचालन वाहिनी समूहात हे उपक्रम राबवले, यामुळे कंपनीची पर्यावरण पूरक कार्यपद्धतीशी कंपनीची असलेली बांधिलकी दिसते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. हे प्रमाणपत्र मिळाल्याने अदाणी ट्रान्समिशन ही आतापर्यंत झिरो वेस्ट टू लॅंडफील सर्टिफिकेशन, वॉटर पॉझिटिव्ह सर्टिफिकेशन आणि सिंगल यूज प्लास्टिक फ्री कंपनी अशी प्रमाणपत्रे मिळवणारी पहिलीच कंपनी ठरली आहे.