Thur, March 23, 2023

शिक्षक परिषदेकडून
कंत्राटीकरणाचा निषेध
शिक्षक परिषदेकडून कंत्राटीकरणाचा निषेध
Published on : 16 March 2023, 5:00 am
मुंबई, ता. १६ : राज्याच्या विविध कार्यालयात कंत्राटी कर्मचारी तसेच शिक्षण विभागातही अनेक शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी सरकारने नुकताच शासन निर्णय घेतला. या जीआरची आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने होळी मुंबईत होळी करून निषेध व्यक्त केला. जुन्या पेन्शन योजेनसाठी विविध संघटनांकडून बेमुदत संप सुरू असताना सरकारने १४ मार्चला कर्मचाऱ्यांचे कंत्राटीकरण करणारा शासन निर्णय काढला. त्यावर विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षक परिषदेने जीआरची होळी करून निषेध व्यक्त केला.