Sun, March 26, 2023

एच३एन२ चे ११९ रुग्ण
एच३एन२ चे ११९ रुग्ण
Published on : 16 March 2023, 3:57 am
मुंबई, ता. १६ : राज्यात जानेवारी महिन्यापासून १५ मार्चपर्यंत ‘एच३एन२’चे ११९, तर स्वाईन फ्ल्यूच्या ३२४ रुग्णांचे निदान झाले. इन्फ्ल्यूएन्झाचे रुग्ण वाढत असून संशयित रुग्णांची संख्या दोन लाख ६६ हजार ९१२ वर गेली आहे. सध्या राज्यातील ७३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यात ‘एच३एन२’च्या आणखी एका संशयिताचा मृत्यू आहे. तसेच स्वाईन फ्ल्यूचे आतापर्यंत तीन मृत्यू झाले आहेत.