राज्यात एच३ एन२ चे ४७ चे नवे रुग्ण सकाळ वृत्तसेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात एच३ एन२ चे ४७ चे नवे रुग्ण  सकाळ वृत्तसेवा
राज्यात एच३ एन२ चे ४७ चे नवे रुग्ण सकाळ वृत्तसेवा

राज्यात एच३ एन२ चे ४७ चे नवे रुग्ण सकाळ वृत्तसेवा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : राज्यामध्ये एच३ एन२ च्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात गुरुवारी एच३ एन२ चे ४७ नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या १६६ झाली आहे. त्यामुळे राज्यामध्ये इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची संख्या ५६७ इतकी झाली आहे.
राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून एच३ एन२ च्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात गुरुवारी एच३ एन २चे ४७ नवीन रुग्ण सापडल्याने राज्यातील एच३ एन२ रुग्णांची संख्या १६६ इतकी पोहोचली आहे. तसेच एच १ एन १ चे ७७ नवीन रुग्ण सापडले असून, रुग्णांची संख्या ४०१ इतकी झाली आहे. इन्फ्ल्यूएंझाच्या एच१ एन१ आणि एच३ एन२ या दोन्ही प्रकारचे एकूण रुग्ण ५६७ इतके झाले आहेत. यातील १४९ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत राज्यात एच१ एन १ ने तीन जणांचा मृत्यू झाला असून, एच३ एन२ ने एका संशयिताचा मृत्यू झाला आहे. राज्यामध्ये आतापर्यंत इन्फ्ल्यूएंझाचे ३ लाख २ हजार ३७२ संशयित रुग्ण सापडले असून, त्यातील १६३५ संशयित रुग्णांना ऑसेलटॅमीवीर देण्यात आली आहे.

इन्फ्ल्यूएंझाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना आरोग्य विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच मृत्यू अवलोकन करण्याच्या सूचनाही राज्यस्तरावरून देण्यात आल्या आहेत. फ्ल्यू प्रतिबंधासाठी आयईसीचे प्रोटोटाईप देण्यात आले आहे.

---
इन्फ्ल्यूएंझा टाळण्यासाठी हे करा
साबण व स्वच्छ पाण्याने वारंवार हात धुवा.
पौष्टिक आहार घ्या.
लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा.
धूम्रपान टाळा.
पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.
भरपूर पाणी प्या.