संपाच्या सहावा दिवस; रुग्णांचे हाल सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संपाच्या सहावा दिवस; रुग्णांचे हाल सुरूच
संपाच्या सहावा दिवस; रुग्णांचे हाल सुरूच

संपाच्या सहावा दिवस; रुग्णांचे हाल सुरूच

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील चतुर्थ, तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. रविवारी संपाचा सहावा दिवस होता. रुग्णांचे हाल अधिक बिकट झाले आहेत. शिकावू डॉक्टर, काही कंत्राटी कर्मचारी रुग्णसेवा करताना आढळून आले.
काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि पालिकेच्या नर्स यांच्या भरवशावर सध्या राज्य सरकारी रुग्णालयांतील सेवा जेमतेम सुरू आहे. रुग्णालयीन परिसरात अस्वच्छता ‘जैसे थे’ अवस्थेत आहे. रविवारी अत्यावश्यक शस्त्रक्रियेच्या शेड्युलप्रमाणे तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. संपावर न गेलेल्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रिया केल्या. त्यांच्या मदतीला पालिकेच्या परिचारिका होत्या, असे जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले. वॉर्डात दाखल असलेल्या रुग्णांना संप सुरू झाल्यापासून बाहेरून जेवण मागवण्यात येत आहे. सुरुवातीचे तीन दिवस सामाजिक संस्थांनी रुग्णांना जेवण पुरवण्याचे काम केले. लेखी आश्वासन मिळेपर्यंत आणि मागण्या मान्य होईपर्यंत हा संप मागे घेणार नसल्याचे सांगत आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील, असे परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.