मालेगाव खटल्याप्रकरणी
एटीएस अधिकाऱ्याला समन्स

मालेगाव खटल्याप्रकरणी एटीएस अधिकाऱ्याला समन्स

मुंबई, ता. १० : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात वारंवार नोटीस बजावूनही गैरहजर राहणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्याला विशेष न्यायालयाने सोमवारी दहा हजार रुपयांचे जामिनपात्र समन्स जारी केले.
मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला सध्या विशेष एनआयए न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणाचा सुरुवातीला एटीएसकडून तपास सुरू होता. त्यानंतर हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आला. तत्पूर्वी सदर अधिकाऱ्याने काही साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. न्यायालयाने यापूर्वी अनेकदा संबंधित अधिकाऱ्याला साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजेरी लावण्याचे निर्देश दिले होते; मात्र या नोटिशीची त्यांनी अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर विशेष न्यायालयाने २ मे रोजी त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या खटल्यातील प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितची दोषमुक्ततेसाठी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली आहे. फौजदारी दंडसंहितेच्या कलम १९७ नुसार पुरोहितवर खटला चालवण्यासाठी शासकीय परवानगीची आवश्यकता नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com