कलावंतांच्या पाठीशी राहणार

कलावंतांच्या पाठीशी राहणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : आपल्या कलेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे काम कलाकार करतात. येणाऱ्या काळात महाराष्ट्र आर्थिक क्षेत्राबरोबर सांस्कृतिक क्षेत्रातही आघाडीवर राहील, महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वाढावे यासाठी सांस्कृतिक विभाग कलावंतांच्या पूर्णतः पाठीशी राहील, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत नाट्यगृहे मराठी नाटकांसाठी अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण आज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील कलांगण येथे करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. मुनगंटीवार म्हणाले, की राज्यभरात सध्या ८३ नाट्यगृहे असून २२ नाट्यगृहे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहेत. उर्वरित ५२ नाट्यगृहांचे नूतनीकरण यासह राज्य शासनाच्या रवींद्र नाट्य मंदिराचे नूतनीकरण याला प्राधान्य देण्यात येणार आहे. या वेळी उत्सव महासंस्कृतीचा हा नृत्य, नाट्य, भक्ती, संगीत आणि रंजन करणाऱ्या कलांचे सादरीकरण असणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. श्रीधर फडके, सावनी रवींद्र, कृष्णा मुसळे, कार्तिकी गायकवाड आदी कलाकरांनी सादरीकरण केले.
...
विविध पुरस्कारार्थी
नाटक या क्षेत्रासाठी कुमार सोहोनी आणि गंगाराम गवाणकर, कंठसंगीत या क्षेत्रासाठी पंडित कुमार सुरुशे आणि कल्याणजी गायकवाड, उपशास्त्रीय संगीत या क्षेत्रासाठी शौनक अभिषेकी आणि देवकी पंडित, मराठी चित्रपटासाठी मधु कांबीकर आणि वसंत इंगळे, कीर्तन क्षेत्रासाठी ज्ञानेश्वर वाबळे आणि गुरुबाबा औसेकर, शाहिरी या क्षेत्रासाठी शाहीर अवधुत विभूते आणि कैलासवासी शाहीर कृष्णकांत जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नृत्य या क्षेत्रासाठी शुभदा वराडकर आणि जयश्री राजगोपालन, कलादान या क्षेत्रासाठी अन्वर कुरेशी आणि देवेंद्र दोडके, वाद्यसंगीत क्षेत्रासाठी सुभाष खरोटे आणि ओमकार गुलवडी, तमाशा क्षेत्रासाठी शिवाजी थोरात आणि सुरेश काळे, लोककला क्षेत्रासाठी सरला नांदुलेकर आणि कमलबाई शिंदे, आदिवासी गिरिजन क्षेत्रासाठी मोहन मेश्राम आणि गणपत मसगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com