देवनार पशुवधगृहात सीसीटीव्‍हीची नजर : ३०० कॅमेरा बसवणार ;

देवनार पशुवधगृहात सीसीटीव्‍हीची नजर : ३०० कॅमेरा बसवणार ;

देवनार पशुवधगृहात सीसी टीव्‍हींची नजर
‘बकरी ईद’निमित्त तीनशे कॅमेरे, दोन व्हिडीओ वॉल आणि पाच एलईडी स्‍क्रीन

इंट्‍रो

जूनमध्ये येणाऱ्या ‘बकरी ईद’ (ईद-उल-झुआ) सणानिमित्ताने देवनार पशुवधगृहात सुरक्षा व्यवस्थेवर अधिक भर देण्यात येत असून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत.
यंदाच्‍या ‘बकरी ईद’ला देवनार पशुवधगृहात दरवर्षीप्रमाणेच देशाच्‍या विविध भागांतून विक्रेते येणार आहेत. त्याची दखल घेत पशुवधगृहात तीनशे सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्याशिवाय दोन व्हिडीओ वॉल आणि पाच एलईडी स्‍क्रीनसह १२ पीटीझेड कॅमेरे लावून सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे.
---

आशिया खंडातील सर्वांत मोठे असलेल्या महापालिकेच्‍या देवनार पशुवधगृहातील सेवा-सुविधा अधिकाधिक प्रभावीपणे देता याव्‍यात म्हणून महापालिका सातत्‍याने विविध प्रकारे कार्यवाही करत असते. पालिका आयुक्‍त इक्बालसिंह चहल, अतिरिक्‍त पालिका आयुक्‍त (शहर) आशीष शर्मा, उपायुक्‍त (अभियांत्रिकी) अशोक मिस्त्री इत्यादींच्‍या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यंदाच्‍या बकरी ईद सणाला देवनार पशुवधगृहात दरवर्षीप्रमाणेच देशाच्‍या विविध भागांतून विक्रेते येणार आहेत. साहजिकच त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीसी टीव्ही कॅमेरे, एलईडी स्क्रीन आणि पीटीझेड कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली.

साधारण बकरी ईदच्‍या १० ते १५ दिवस आधी विक्रेते देवनार पशुवधगृहात दाखल होतात. त्यांच्‍यासोबत दोन ते अडीच लाख बकरे आणि १२ ते १५ हजार म्‍हैसवर्गीय जनावरे असतात. मोठ्या संख्‍येने खरेदीदारही येत असतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह पशुवधगृहात लावण्यात येणारी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्याची कार्यवाही पालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाद्वारे करण्यात येणार आहे. परिसरात पॅन-टिल्‍ट-झूम (पीटीझेड) ची सुविधा असणारे १२ टेहळणी कॅमेरे, दोन व्हिडीओ वॉल आणि पाच एलईडी स्‍क्रीनही लावण्‍यात येणार आहेत. यांत्रिकी व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता पेरेकर यांनी सांगितले, की बकरी ईद कालावधीदरम्‍यान सुरक्षा व्‍यवस्‍था अधिक चोख ठेवण्‍याच्‍या दृष्‍टीने सीसीटीव्‍ही कॅमेरे व संबंधित अत्‍याधुनिक यंत्रणा साधारण १५ दिवसांच्‍या कालावधीसाठी असेल. कामाची निविदा प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. निविदेमध्‍ये संबंधित यंत्रणेसह अभियंता, तंत्रज्ञ व पर्यवेक्षक नेमण्‍याची जबाबदारीही संबंधित सेवा पुरवठादार संस्‍थेची असेल. पावसाळ्यात सीसीटीव्‍ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असल्‍याने चित्रीकरणावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची काळजीही संबंधित सेवा पुरवठादार संस्‍थेला घ्‍यावी लागणार आहे.

अशी असेल सुरक्षा
- तीनशेपैकी काही सीसीटीव्‍ही ‘पोल माऊंटेड’ असतील. व्हिडीओ वॉल पाच बाय आठ फुटांची असेल.
- प्रभावी जोडणीच्‍या दृष्‍टीने फायबर ऑप्टिकल केबलही बसवण्‍यात येणार आहेत. त्यामुळे अधिक चांगल्‍या गुणवत्तेचे चित्रीकरण करता येणार आहे.
- निविदेमध्‍ये ‘पीटीझेड’ कॅमेरे उपलब्‍ध करून देण्‍याचाही समावेश आहे. असे कॅमेरे वर-खाली व वेगवेगळ्या कोनात रिमोट पद्धतीने फिरवता येतात.
- एखादी बाब संशयास्‍पद वाटत असेल तर नियंत्रण कक्षातूनच कॅमेरा ‘झूम’ करून खातरजमा करता येते. परिणामी पालिकेच्‍या सुरक्षा विभागाला आणि मुंबई पोलिस दलास नियंत्रण कक्षातून देवनार पशुवधगृह परिसरावर देखरेख ठेवणे सहज शक्‍य होणार आहे.

जनावरांसाठी शेल्टर्स
देवनार पशुवधगृहाच्‍या ६४ एकरच्‍या प्रशस्‍त जागेत बकरी ईदनिमित्त लाखो नागरिक एकत्र येतात. महापालिकेच्‍या वतीने तिथे बकरे व म्‍हैसवर्गीय जनावरांसाठी अतिरिक्‍त निवारा केंद्रे (शेल्‍टर्स) उभारण्‍यात येतात. जनावरांसाठी पाणी, चारा आणि प्राथमिक पशुवैद्यकीय आरोग्‍य केंद्रांची व्‍यवस्‍था करण्‍यात येते. यंदा २८ जून २०२३ रोजी बकरी ईद सण अपेक्षित असून त्‍या दृष्‍टीने ७७ हजार चौरस मीटर जागेवर तात्‍पुरते निवारा केंद्र आणि मंडपही उभारण्‍यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com