पूर्व उपनगरातील सांडपाण्यावर प्रक्रिया

पूर्व उपनगरातील सांडपाण्यावर प्रक्रिया

पूर्व उपनगरातील सांडपाण्यावर प्रक्रिया
घाटकोपर येथील मलनिस्सारण एसटीपी केंद्राची दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : पूर्व उपनगरातील सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया करण्यासाठी घाटकोपर येथील मलनिस्सारण एसटीपी केंद्राची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे येथील बंद पडलेले केंद्र दोन वर्षांनंतर सुरू होणार असून त्‍यासाठी पालिका सव्वा कोटी रुपये खर्च करणार आहे.
नवीन घाटकोपर एसटीपी केंद्र २००३ मध्ये कार्यान्वित करण्यात आले असून ते २४ तास सुरू असते. या केंद्रात एल, एम, एन व एस या प्रभागांतून मलजल येते व त्या मलजलावर प्रक्रिया करून ते पाणी खाडीमध्ये उत्सर्जित केले जाते. या कामासाठी १३८ एमएलडी क्षमतेचे ५ मुख्य एसटीपी केंद्र बसवलेले असून यांची एकूण क्षमता ६९० एमएलडी आहे. घाटकोपर येथील एसटीपी केंद्र हे पूर्व उपनगरातील महत्त्‍वाचे केंद्र आहे.

केंद्र बंद पडण्याचे कारण
एसटीपी केंद्राच्या सततच्या कार्यशीलतेमुळे इंपेलर शाफ्ट, शाफ्ट स्लीव्ह बेअरिंग्ज, वेअरिंग रिंग अशा भागांची झीज होते. परिणामी केंद्र बंद पडण्याची शक्यता असते. घाटकोपर येथील एसटीपी केंद्रातील मुख्य केंद्र हे एप्रिल २०२१ पासून मलजलाच्या गळतीमुळे बंद स्थितीत आहे. तसेच विविध भागांची झीज झाल्यामुळे ते बदली करणे आवश्यक आहे. यामुळे मुख्य एसटीपी केंद्राची क्षमता ९० एमएलडीपर्यंत कमी झालेली आहे.

कार्यक्षमतेत वाढ
पालिकेच्‍या विभागामार्फत मुख्य एसटीपी २०१ व २०२ व २०३ यांच्या बॅक पूलआऊट असेम्बली खरेदी करून अनुक्रमे २०१९, २०२० व २०२१ मध्ये बदलण्यात आलेल्या आहेत. यामुळे दोन्ही एसटीपी केंद्रांच्‍या कार्यक्षमतेत वाढ झालेली आढळून आली आहे. या कामाच्या धर्तीवर मुख्य एसटीपीच्या बॅक पूल आऊट असेम्बली बदलीसह नूतनीकरण करण्याचे प्रस्तावित आहे.

यांना मिळाले काम
पालिकेने कामाचे १,१०,०७,१२२ रुपयांचे अंदाजपत्रक बनवले आहे. पालिकेने मागवलेल्या निविदा सूचनेस मे. विजय इंजिनिअरिंग अॅण्ड मशिनरी कंपनी, मे. एआरडब्ल्‍यू इन्फ्रा प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड, मे. के. राजेश अॅण्ड कंपनी या तीन जणांनी प्रतिसाद दिला. मे. विजय इंजिनिअरिंग अॅण्ड मशिनरी कंपनी यांच्या लघुतम प्रतिसादामुळे त्यांना काम देण्यात आले आहे. या कामामधील नूतनीकरणाचा कंत्राट कालावधी एकूण ३० महिने असणार आहे. बॅक पुल आऊट असेम्बली बदली केल्यामुळे एसटीपी केंद्राचे आयुष्यमान ४ ते ५ वर्षे वाढेल. यावर एकूण १,१५,१९,८५० रुपये खर्च येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com