पाचवी-आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

पाचवी-आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई, ता. २९ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ फेब्रुवारीला घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) तसेच शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी)चा अंतरिम निकाल आज जाहीर करण्यात आला असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलेजा दराडे यांनी दिली.
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ५५ हजार ५५७; तर आठवीत १ लाख १३ हजार ९३८ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. पाचवीत एकूण २२.१६ टक्के विद्यार्थी; तर आठवीत १५.६० टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पाचवीत सर्वाधिक पात्र होण्याचा निकाल कोल्हापूर जिल्हा ३९.९३ टक्के आणि त्याच विभागाचा ३२. ४३ टक्के असा सर्वाधिक निकाल लागला आहे; तर मुंबई विभागाचा केवळ १७.८० आणि मुंबई पालिकेचा निकाल हा १९.२३ टक्के इतका आहे. सर्वांत कमी निकाल हा गडचिरोली जिल्ह्याचा केवळ ६.९६ टक्के इतका आहे.
आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण १५.६० टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यामध्येही कोल्हापूर जिल्हा २९.२६ टक्के आणि विभागातून २३.०४ टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यानंतर मुंबई विभागाचा २१.०३, मुंबई पालिकेचा २३.५३ असा चांगला निकाल लागला आहे. आठवीत सर्वांत कमी निकाल हा चंद्रपूर जिल्ह्याचा केवळ ७.५ टक्के इतका आहे.
...
एकूण विद्यार्थीसंख्या
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला राज्यभरातून ५ लाख ३२ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात १८ हजार ७४५ गैरहजर राहिले; तर परीक्षेला ५ लाख १४ हजार १३१ उपस्थित होते; तर आठवीच्या परीक्षेला ३ लाख ६७ हजार ८०२ जणांनी नोंदणी केली होती, त्यातील ११ हजार ७७० गैरहजर राहिले आणि ३ लाख ५६ हजार ३२ जणांनी परीक्षा दिली होती.
...
निकाल इथे पाहा!
पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्याचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये ९ मेपर्यंत अर्ज करता येईल. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता ५० रुपये शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com