
सायबर सिक्युरिटी विषयावर ‘गेल’तर्फे परिसंवाद
नवी दिल्ली, ता. २८ ः डिजिटायझेशन अँड सायबर सिक्युरिटी या विषयावर गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लि. (गेल) तर्फे नुकताच येथे परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादाला इंडियन ऑईल, ओएनजीसी, बीपीसीएल, एचपीसीएल आदी सरकारी कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आजच्या डिजिटल युगात उद्भवणारे धोके आणि आव्हाने या विषयावर चर्चा करून परस्परांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी तसेच एकमेकांच्या ज्ञानाची माहिती घेऊन आपली व्यवस्था सुरक्षित करण्यासाठी हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. कामकाजातील डिजिटलायझेशन वाढते आहे तसे त्यातील सायबर धोके तसेच सायबर हल्ल्यांची संख्याही वाढते आहे. त्यामुळे आपल्या व्यवसायाचा संवेदनशील तपशील तसेच कामकाजाच्या पद्धती, यंत्रणा हे सायबर हल्ल्यांपासून सांभाळून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे ‘गेल’चे संचालक आर. के. जैन म्हणाले.