
काळाघोडा परिसराला लवकरच नवी झळाळी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः फोर्टमधील काळाघोडा परिसर ही मुंबईची सांस्कृतिक ओळख आहे. अनेक कलात्मक मेळावे या परिसरात होतात. आता या परिसराचे सुशोभीकरण होणार असून या परिसराला नवीन झळाळी प्राप्त होणार आहे. अंतर्गत रस्त्यांचे सुशोभीकरण आणि आकर्षक दिव्यांनी हा परिसर लवकरच उजळणार आहे.
काळाघोडा आर्ट ॲव्ह्येन्यू परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर बसाल्ट स्टोन बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे या रस्त्यांना आकर्षक लूक प्राप्त होणार आहे. तसेच रस्त्यांवर विशेष दिवे लावण्यात येणार आहेत. यामुळे या परिसराला हेरिटेज लूक येणार आहे. महापालिकेच्या नियोजन विभागाने यासाठी आराखडा तयार केला आहे. हा संपूर्ण परिसर आकर्षक दिव्यांनी सजवण्यात येणार आहे. अंतर्गत रस्त्यांचे काम झाल्यानंतर त्यावर कलाकृतीसदृश फलक बसवण्यात येणार आहेत. हे काम सी. ई. इन्फ्रा कंपनीला देण्यात आले असून यावर पावणेसहा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.