Tue, October 3, 2023

१०५ प्राध्यापकांचा पदांना मान्यता
१०५ प्राध्यापकांचा पदांना मान्यता
Published on : 30 May 2023, 4:19 am
मुंबई, ता. ३० : राज्यातील शासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माण पदवी व पदव्युतर पदवी महाविद्यालयांत तसेच लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात प्राध्यापकांची १०५ पदे निर्मिती करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यासाठीचा निर्णय आज मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ग्रेड वेतन ७ हजार ६०० किंवा त्यापेक्षा जास्त ग्रेड वेतनाची ही पदे असून यामध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विभाग प्रमुख, अधिष्ठाता, संचालक अशी विविध पदे असतील. यासाठी २३ कोटी ५२ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.