सांडपाणी प्रक्रिया केंद्र येथिल कर्मचारी वसाहतीचे पुर्न: बांधकाम होणार ,

सांडपाणी प्रक्रिया केंद्र येथिल कर्मचारी वसाहतीचे पुर्न: बांधकाम होणार ,

सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील
कर्मचारी वसाहतीची पुनर्बांधणी
७० सदनिकांची सुविधा मिळणार; ७० कोटींचा खर्च
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः कुलाबा सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील कर्मचारी वसाहतीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. संबंधित जागी असलेल्या इमारती पाडून नव्याने बांधण्यात येणार आहेत. प्रस्तावित इमारतींचे संरचनात्मक आराखडे बनविण्यासाठी आणि प्रकल्प व्यवस्थापनाकरिता सल्लागार मेसर्स मास्टर अॅण्ड असोसिएट्स यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी ७० कोटी खर्च केला जाणार आहे. कर्मचाऱ्यांना ७० सदनिका उपलब्ध होणार आहेत.
सदर कामाचे आराखडे महापालिका वास्तुशास्त्रज्ञ व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांनी तयार केले आहेत. आराखड्यानुसार स्टिल्ट अधिक सहा मजले इमारतीची बांधणी करण्याचे प्रस्तावित आहे. प्रस्तावातील एका इमारतीमध्ये एकूण तीन विंग आहेत. सदर कामाचे आराखडे, स्थापत्य आणि विद्युत व यांत्रिकी कामाचे अंदाजपत्रक सल्लागारामार्फत तयार करून घेण्यात आले आहे. त्या कामात एका इमारतीअंतर्गत तीन विंग बांधण्यात येणार असून प्लॉट क्षेत्रफळ २५५१.८९ चौरस मीटर आहे. त्यामध्ये ११४.३८, ७१.००, ३०.०८ आणि १०२.७ चौ. मी.च्या सदनिका आहेत.
प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मेसर्स मास्टर अॅण्ड असोसिएट्स यांनी ६३ कोटी आठ लाख दोन हजार ६६० रुपये इतक्या किमतीचे कार्यालयीन अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यासाठी पालिकेने ऑनलाईन पद्धतीने ई-निविदा मागवल्या आहेत. त्याला एकूण तीन निविदाधारकांकडून प्रतिसाद मिळाला. त्यात मेसर्स ए. जी. एस. ए.- सी. ई. इन्फ्रा (जेव्ही), मेसर्स ए. जी. एस. ए. इन्फ्रा अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. आणि जे. व्ही. भागीदार मे. सी. ई. इन्फ्रा (इंडिया), मेसर्स हिरानी एंटरप्रायजेस, मेसर्स देव इंजिनिअर्स इत्यादींचा समावेश होता. त्यांपैकी कमी निविदाकार असलेली मेसर्स ए. जी. एस. ए. सी. ई. इन्फ्रा (जेव्ही) कंपनी पात्र ठरली. त्यांनी ७० कोटी एक लाख वीस हजार ९५२ रुपयांची बोली लावली. पावसाळ्यासह तीन महिने ना-हरकत प्रमाणपत्र मिळवणे आणि २४ महिने प्रत्यक्ष कामाचा कालावधी देण्यात आला आहे. दोष दायित्व कालावधी दुरुस्ती व देखभाल काम पूर्ण झाल्यापासून दहा वर्षे इतका असणार आहे.

अशा आहेत सुविधा
स्टिल्ट फ्लोअर, एंट्रन्स लॉबी, उद्‍वाहन, जिना, स्टॅक पार्किंग, मीटर रूम, सोसायटी कार्यालय, प्रसाधन गृह, मीटिंग रूम, शाफ्ट्स इत्यादी सेवा नव्या इमारतीत मिळणार आहेत. टेरेस एरिया, जिना, लिफ्ट आणि पार्किंगची सुविधाही आहे. इलेक्ट्रिक सब स्टेशन, पथदिवे, रस्ते, पाणीपुरवठा, अग्निशमन यंत्रणा, पावसाचे पाणी साठवण यंत्रणा, सांडपाणी व्यवस्था, मलनिःसारण वाहनी, दूरध्वनी यंत्रणा आणि संरक्षक भिंतही बांधून देण्यात येणार आहे.

..........................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com