अकरावीच्या दुसऱ्या भागाची नोंदणी सोमवारपासून

अकरावीच्या दुसऱ्या भागाची नोंदणी सोमवारपासून

मुंबई, ता. १ : मुंबई महानगरक्षेत्रासह पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेशासाठी भाग पहिला नोंदविण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालामुळे २ जूननंतर संपणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून ५ जूनपासून भाग दुसरा आणि त्यातील महाविद्यालयांची पसंती, निवड आदींची नोंदणी सुरू केली जाणार आहे. दहावीच्या निकालामुळे अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

पाच महापालिका क्षेत्रात अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी पात्र असलेल्या १ हजार ६६७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी इंटेकच्या ५ लाख ८६ हजार ३५ जागा उपलब्ध आहेत. तर सर्वाधिक जागा मुंबई महानगर क्षेत्रात ३ लाख ७५ हजार ५७५ जागा उपलब्ध आहेत. मागील वर्षी झालेल्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान मुंबई विभागात तब्बल मुंबई विभागात ९८ हजार ६६८ जागा रिक्त रहिल्या होत्या. यंदा काही नवीन महाविद्यालयांची भर पडणार असल्याने या जागामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
--
अकरावी ऑनलाईनच्या जागाची स्थिती
विभाग महाविद्यालये ऑनलाईनसाठी जागा
अमरावती ६५ १६१९०
मुंबई १०१६ ३७५५७५
नागपूर २०४ ५५८००
नाशिक ६३ २६४८०
पुणे ३१६ १११९९०
एकूण १६६७ ५८६०३५
---
शाखानिहाय जागांची संख्या
विभाग कला वाणिज्य विज्ञान एमसीव्हीसी
अमरावती ३६३० २८१० ७००० ३३२
मुंबई ४९२९० २०२०६० १२१३४० ५००५
नागपूर ८६६० १६३६० २६६७० ३८५०
नाशिक ४९५० ८६९० १०७६० १०४०
पुणे १७०६० ४५१५५ ४६०९० ३७६५
एकूण ८३५९० २७५०७५ २११८६० १६४१०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com