मुंबई विभागाचा निकाल ९३.६६ टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विभागाचा निकाल ९३.६६ टक्के
मुंबई विभागाचा निकाल ९३.६६ टक्के

मुंबई विभागाचा निकाल ९३.६६ टक्के

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : दहावीच्या परीक्षेत मागील तीन वर्षांत मुंबईच्या निकालात मोठी घट झाली आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ९३.८३ टक्के लागलेला असताना मुंबई विभागाचा निकाल ९३.६६ टक्के इतका लागला आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल रायगड जिल्ह्याचा ९५.२८; तर त्या खालोखाल बृहन्मुंबईचा ९३.९५ टक्के, ठाणे जिल्ह्याचा ९३.६३ टक्के आणि मुंबई उपनगर-१ आणि पालघर जिल्ह्याचा सारखाच असा ९३.५५ टक्के लागला आहे. मुंबई उपनगर-२ चा सर्वांत कमी ९२.५६ टक्के इतका निकाल आहे. मुंबई विभागातून एकूण ३ लाख ३७ हजार १७८ जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख ३५ हजार १२० जण परीक्षेला बसले होते. त्यातील ३ लाख १३ हजार ८७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९३.६६ टक्के इतका लागला आहे.

मुंबई विभागातील विद्यार्थी
जिल्हा एकूण विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
ठाणे ११११८२ १०४१०२ ९३.६३
रायगड ३४४७४ ३२८४७ ९५.२८
पालघर ५७७२० ५३९९९ ९३.५५
बृहन्मुंबई २८८३६ २७०९४ ९३.९५
मुंबई उप.-१ ५८००० ५४२६३ ९३.५५
मुंबई उप.-२ ४४९०८ ४१५७१ ९२.५६
एकूण ३३५१२० ३१३८७६ ९३.६६

मुले-मुलींचे उत्तीर्ण प्रमाण
मुले परीक्षेला बसलेले उत्तीर्ण एकूण प्रमाण
मुले १७३६०३ १५९६३५ ९१.३५
मुली ११६५१७ १५४२४१ ९५.४९
--
श्रेणी निहाय निकाल
प्रथम श्रेणी ७५ टक्के व अधिक - ९२५०५
प्रथम श्रेणी ६० टक्के व अधिक- १२००१
द्वितीय श्रेणी ४५ टक्के व अधिक - ८३०७०
उत्तीर्ण श्रेणी ३५ टक्के व अधिक - २६३००