अकरावी प्रवेशाचा प्रश्न नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावी प्रवेशाचा प्रश्न नाही
अकरावी प्रवेशाचा प्रश्न नाही

अकरावी प्रवेशाचा प्रश्न नाही

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागातून उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अकरावीसाठी प्रवेश मिळेल इतक्या मुबलक जागा उपलब्ध आहेत. मुंबई विभागातून दहावीत तीन लाख १३ हजार ८७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत; तर अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मुंबई महाक्षेत्रात असलेल्या १ हजार २० कनिष्ठ महाविद्यालयांतून तब्बल ३ लाख ७७ हजार ६९५ जागा उपलब्ध आहेत. यामुळे अकरावीसाठी मुबलक जागा आहेत.
यासोबत मुंबईतील शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये ४० हजारांहून अधिक जागा असून त्यामध्येही विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. अकरावी प्रवेशासाठी भाग पहिला भरण्याची मुदत ही सोमवारी ५ जून रोजी संपणार असून त्यानंतर दुसऱ्या भागाची नोंदणी सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दुसरीकडे आयटीआयच्या प्रवेशाचे वेळापत्रकही लवकरच जाहीर होणार असून मुंबई विभागात अकरावी आयटीआयसह तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पॉलिटेक्निकच्या जागांचाही पर्याय उपलब्ध आहेत.