ई-व्हेईकल खरेदीमध्ये १२ टक्क्यांची वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई-व्हेईकल खरेदीमध्ये १२ टक्क्यांची वाढ
ई-व्हेईकल खरेदीमध्ये १२ टक्क्यांची वाढ

ई-व्हेईकल खरेदीमध्ये १२ टक्क्यांची वाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः वाहनांमुळे वाढत्या प्रदूषणाची समस्या लक्षात घेत शासनाने पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांचे धोरण आणले. ई वाहन खरेदीसाठी प्रोत्साहन देत ई चार्जिंग स्टेशनची संख्याही वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवीन आकडेवारीनुसार ई व्हेईकल रजिस्ट्रेशनमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

२०१८ पासून ई व्हेईकल धोरणावर अधिक भर देण्यात आला. सुरुवातील ई-व्हेईकल खरेदीकडे ग्राहकांचा फारसा कल नव्हता; मात्र नंतर तो वाढला. ‘वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट’च्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये ४६४१ व्हेईकलची नोंदणी झाली. २०१९ मध्ये हा आकडा ७३२० पर्यंत पोचला. नंतर मात्र कोविड महामारीचा फटका खरेदीला बसला. त्यामुळे २०२० मध्ये केवळ ७१३७ ई-व्हेईकलची नोंदणी झाली. कोविड महामारीनंतर मात्र खरेदी पुन्हा वाढली. २०२१ मध्ये तब्बल २९,९०८ ई-व्हेईकलची नोंदणी झाली. २०२२ मध्ये ई-खरेदीमध्ये चौपट वाढ झाली. या वर्षी तब्बल १ लाख ३६ हजार ३९ नोंदणी झाली.
................
ई-चर्जिंग स्टेशनवर भर
ईव्हीच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता इंधन आणि चार्जिंग सुविधांसाठी सर्वसमावेशक योजना आणि त्याची अंमलबजावणी करणे उचित ठरणार आहे. त्यासाठी एमएमआर क्षेत्र वगळून २०२५ पर्यंत राज्यात किमान १,५०० चार्जिंग स्टेशन उभारण्याचे ईव्ही धोरणाचे लक्ष्य आहे. यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये चार्जिंगच्या मागणीचा अंदाज घेण्यात येत आहे. मुंबईत अधिकाधिक चार्जिंग पॉइंट सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मुंबईसाठी बसथांबे, रेल्वेस्थानके, शॉपिंग मॉल, भोजनालये, सोसायट्या आणि लोकसंख्येची घनता असलेल्या सार्वजनिक ठिकाणी ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा विचार आहे.