दहिसर खारफुटीत इको-टूरिझम

दहिसर खारफुटीत इको-टूरिझम

दहिसरमध्ये इको-टुरिझम
वनविभागाकडून खारफुटीच्या २०० एकर क्षेत्रावर लवकरच सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः निसर्गप्रेमींना लवकरच दहिसरच्या हिरव्यागार फुप्फुसात तल्लीन होणारे पर्यावरण पर्यटन अनुभवता येणार आहे. वनविभागाच्या खारफुटी कक्षाने एक विस्तीर्ण निसर्ग उद्यान जेट्टीच्या कामाचे नियोजन केले असून २०० एकर क्षेत्रावर हे काम लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर पर्यटकांना दहिसरमधील खारफुटीत इको-टुरिझमचा आनंद घेता येणार आहे.
उद्यानाच्या बांधकामाच्या निविदा प्रक्रिया जूनच्या अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हे काम पूर्ण झाल्यावर या संरचनेत ‘मॅन्ग्रोव्ह म्युझियम’ तयार करण्यात येणार आहे. त्यात एक झुलता काचेचा पूल असेल, तसेच अभ्यागतांना आजूबाजूच्या पाणथळ प्रदेशांचे दर्शनदेखील घेता येणार आहे.

कोठे असेल हे केंद्र?
मुंबईच्या विकास आराखड्यात ८० हेक्टर नैसर्गिक क्षेत्रफळाच्या जमिनी आरक्षित करून आता चार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. नैसर्गिक क्षेत्र हे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या जमिनींसाठी एक प्रकारचे आरक्षण आहे. यात काही प्रतिबंधित भाग असून प्रतिबंधित प्रकल्पाचा केंद्र भाग ५,१०० चौरस मीटरचा आहे. अत्याधुनिक निसर्ग व्याख्या केंद्र (एनआयसी) गोराई खाडीच्या काठावर वसलेले असून तेथे लिंक रोडने किंवा गोरल येथून बोटीद्वारे जाता येणार आहे.

अशी आहे रचना
दहिसर येथील खारफुटी ही अतिशय घनदाट असून जंगलात मोक्याच्या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. त्याची रचना अशी आहे, की केंद्राच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्याशिवाय ती दिसणार नाही. ही रचना जमिनीपासून उंच आहे आणि स्कायवॉकसारखी डिझाईन केलेली आहे. ४०० मीटर लांबीचा ‘मॅन्ग्रोव्ह ट्रेल’ देखील ओहोटीच्या रेषेच्या समांतर स्टिल्टवर बांधला जात आहे. गोराई खाडी आणि दहिसर नदीमध्ये प्रस्तावित कयाकिंग सहलीसाठी एक पिकअप पॉइंट म्हणून विकसित होणार आहे.

पर्यटकांसाठी विविध सुविधा
दररोज सुमारे ४०० पर्यटक येथे अपेक्षित असून यात मॉर्निंग वॉकर्सचा समावेश आहे. त्‍यांना दररोज दोन तास सुविधा वापरण्यासाठी मासिक पास दिले जातील. पायवाटेच्या शेवटी एक नवीन बोट लँडिंग केंद्र व दहिसर जेट्टी प्रस्तावित करण्यात आली आहे. दहिसर मॅन्ग्रोव्ह पार्कला गोराईतील अशाच एका सुविधेशी जोडले जाणार आहे. ऐरोलीतील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्राप्रमाणेच दहिसरमध्ये खारफुटी आणि सागरी संवर्धनाभोवती संशोधनाचा आधार म्हणून काम करण्यावर मुख्य भर आहे. गोराई येथील सुविधा पर्यटकांसाठी अधिक आकर्षण बनण्याची कल्पना आहे, त्याप्रमाणेच बांधकाम अपेक्षित आहे. सध्या निवदा प्रक्रिया सुरू असून जूनअखेरीस कामाला सुरुवात होईल, असेही वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com