उद्यापासून अकरावी प्रवेशासाठी पसंतीक्रम

उद्यापासून अकरावी प्रवेशासाठी पसंतीक्रम

मुंबई, ता. ६ : मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी उद्यापासून (ता. ८) विद्यार्थ्यांना भाग-२ ची नोंदणी सुरू करता येईल. त्यात महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवता येणार आहे. या पसंतीक्रमात विद्यार्थ्यांना कमीत कमी १; तर जास्तीत जास्त १० महाविद्यालयांचे पर्याय हे १२ जूनपर्यंत नोंदवता येतील.

दहावीच्या निकालापूर्वीच सुरू झालेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या भाग-१ च्या नोंदणीसाठी ७ जूनपर्यंत मुदत देण्यात आली असून त्यासाठी आजअखेरपर्यंत या भागासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मुंबई विभागातून नोंदणी सुरू केलेल्या १ लाख ६९ हजार १९ जणांपैकी आतापर्यंत १ लाख ७ हजार ६२२ जणांनी भाग पहिला पूर्ण भरला आहे; तर पुणे विभागातून नोंदणी केलेल्या ५७ हजार ५०६ पैकी ३६ हजार ७११ विद्यार्थ्यांनी भाग-१ची नोंदणी केली आहे. यातील सर्व विद्यार्थ्यांना ८ जूनपासून भाग-२ साठी नोंदणी करावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी १२ जूनपर्यंत भाग-२ पूर्ण भरला त्यांची १३ जून रोजी ऑनलाईन प्रवेशाची शून्य फेरी प्रसिद्ध होणार आहे. या गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थी तपशिलात काही दुरुस्त्या असल्यास विद्यार्थी ऑनलाईन हरकती नोंदवू शकतात. विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये ग्रीन्हन्स टूल उपलब्ध असून याद्वारे विद्यार्थी सुधारणा सुचवू शकतात.

पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची मुदत १५ जूनला रात्री १० वाजेपर्यंत असेल. अर्जाचा भाग-१ आणि भाग २ लॉक असलेले अर्जच पहिल्या फेरीसाठी ग्राह्य धरले जाणार असल्याने अकरावीच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दोन्ही भागासाठी देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार आपली नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी केले आहे. पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी ही १९ जूनला जाहीर होणार असून या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना १९ ते २२ जूनदरम्यान संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या मुदतीत विद्यार्थ्यांनी आपली सर्व प्रक्रिया पूर्ण करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com