सर्व मॅनहोल्सवर संरक्षक जाळी बसवा

सर्व मॅनहोल्सवर संरक्षक जाळी बसवा

मुंबई, ता. १४ : मुंबई आणि उपनगरांत असलेल्या सरसकट सर्व ७४,६८२ मॅनहोल्सवर संरक्षक जाळी बसवण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई महापालिकेला दिली. अपघात होऊ नये म्हणून सरसकट सर्व मॅनहोल्सवर झाकणे का बसवत नाही, असा सवाल खंडपीठाने केला.
उच्च न्यायालयाने सन २०१८ मध्ये खड्डे आणि मॅनहोल्स सुरक्षेसंबंधित याचिकेत शहरातील सर्व मॅनहोल्सवर सुरक्षित जाळी बसवण्याचे आणि खड्डे दुरुस्तीसाठी यंत्रणा तयार करण्याचे आदेश दिले होते; मात्र प्रशासनाने अद्याप या आदेशांची पूर्तता केलेली नाही. वकील रुजू ठक्कर यांनी याबाबत न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. प्रभारी मुख्य न्या. नितीन जामदार आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने या आदेशांचा उल्लेख आज सुनावणीदरम्यान केला. मॅनहोल्सवर अशा प्रकारे जाळी असावी की जर कोणी त्यावर पडला तर जाळीवर सुरक्षित राहू शकेल, असेही न्यायालयाने सुचवले.
...
१९ जूनपर्यंत योजना मांडा!
शहरात एकूण ७४,६८२ मॅनहोल्स असून १,९०८ वर झाकणे आहेत. पाच वर्षांपूर्वी न्यायालयाने आदेश देऊनही अद्याप सर्व होल्सवर झाकणे नाहीत. याचे सुसंगत कारणही प्रशासनाकडे दिसत नाही, अशी नाराजी खंडपीठाने व्यक्त केली. ज्या भागात पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती असते, तिथे झाकणे बसवली आहेत, असे प्रशासनाचे प्रमुख वकील अनिल साखरे यांनी सांगितले; मात्र सर्वच मॅनहोल्सवर संरक्षक झाकणे असायला हवीत ज्यामुळे नागरिक किंवा प्राणी त्यामध्ये पडणार नाहीत, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. याबाबत महापालिकेला १९ जूनपर्यंत योजना मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com