Devendra Upadhyay :  मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर देवेंद्र कुमार उपाध्याय यांची शिफारस

Devendra Upadhyay : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर देवेंद्र कुमार उपाध्याय यांची शिफारस

देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या नियुक्तीसाठी शिफारस
Published on

मुंबई, ता. ६ : सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियम मंडळाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर नियुक्ती करण्याची शिफारस बुधवारी केंद्र सरकारला केली.

न्या. उपाध्याय अलाहाबाद उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांची नियुक्ती उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदावर झाली होती. मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती रमेश धनुका यांच्या निवृत्तीनंतर या पदावर प्रभारी न्या. नितीन जामदार यांना नियुक्त करण्यात आले आहे. उच्च न्यायालयात सध्या ६६ न्यायाधीश असून मंजूर क्षमता ९४ आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.