वैद्यकीय महाविद्यालयाचा खर्च ३०० कोटींवर

वैद्यकीय महाविद्यालयाचा खर्च ३०० कोटींवर

वैद्यकीय महाविद्यालयाचा
खर्च ३०० कोटींवर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : विलेपार्ले पश्चिमेतील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयाच्या आवारात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय उभारले आहे. सध्या किरकोळ कामे वगळता इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे. रुग्णालयाच्या परिचलन व परिरक्षण खर्चात तब्बल ५२ कोटींची वाढ झाल्याने रुग्णालयाच्या एकूण खर्च ३०० कोटींवर गेला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित बांधकामांबाबत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा कक्ष विभागाने निविदा काढली होती. हे काम मे. न्यू कन्सोलिडेटेड कन्स्ट्रक्शन कं. लि. या कंत्राटदार कंपनीला २३८ कोटी १५ लाख ९७ हजार ४४६ ला दिले होते. तसेच, या कामातील यांत्रिकी व विद्युत कामाचे पर्यवेक्षण उपप्रमुख अभियंता यांच्या यांत्रिकी व विद्युत शाखेने केले. सध्या काही किरकोळ कामे वगळता इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे. कंत्राटाच्या रकमेत पाच वर्षांच्या परिचलन व परिरक्षणच्या ७७ लाख ७९ हजार ८९४ रुपयांचा; तर विद्युतच्या १२ कोटी एक लाख ३१ रुपये या रकमेचा समावेश नव्हता. या खर्चाचा त्यात समावेश केला आहे. शिवाय, रुग्णालयाच्या फिनिशिंग आणि इतर किरकोळ कामांचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे हा खर्च आता २९० कोटी २५ लाख ५५ हजार १२६ कोटींवर पोचला आहे.
......................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com